आपण स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन साजरा करतो. काही ध्येय साध्य झाली त्याचं स्मरण म्हणून ते दिवस आपण साजरे करतो. ती ध्येय साध्य होण्यासाठी कुणी किती कष्ट केले, त्याग केला या सोबतच कुणामधे पराक्रम, धैर्य, चातुर्य असे लोकोत्तर गूण दिसले याचे स्मरण या दिवशी करतो. पुन: पूर्वीची परिस्थिती येउ नये म्हणून जागे राहण्यासाठी हे दिन साजरे करतो.
तसेच या दिनांच्या निमित्ताने आपण कारण ठरलेल्या कटू प्रसंगांची जबाबदारी स्वीकारतो आणि त्याची पुनरावृत्ती होणार नाही याचा विश्वास देतो. आपल्या सोबत घडलेल्या कटू प्रसंगांना जबाबदार असणाऱ्या सगळ्यांना क्षमा करतो. विसरत नाही तर स्मरण करतो की सर्व मागे सोडून नवीन दृष्टी नवीन आशा घेउन आपण पुढे निघालो तो हाच दिवस.
१९१७ साली रशियात स्त्रियांचे बंड झाले, ‘ब्रेड ॲंड पीस’ मिळविण्यासाठी. तो दिवस ८ मार्च, हा महिलादिन म्हणून साजरा केला जातो.
ध्येयाची परिपूर्ती झाली म्हणून नाही तर एखाद्या समूहाला विषमता, अन्याय यांना सामोरं जावं लागतं ते सगळ्यांच्या डोळ्यासमोर आणण्यासाठी दिन साजरे करण्याची पद्धत रूढ झाली.
अपूर्ण ध्येय डोळ्यासमोर ठेवण्यासाठी पाळला जाणारा महिलादिन लवकरात लवकर परिपूर्तीसाठी साजरा होवो ही सर्वांसाठी शुभेच्छा
Dr Nitin Patankar
Consultant – Diabetes, Obesity and Lifestyle Disorders
Wisdom Clinic – Mulund
Jupiter Hospital Thane
Contact : 9223145555