कोरोनामुळे असेही घडते….

काल मी कोरोनाचा एक नवीन दु:ष्परिणाम बघितला.आमच्या हॅास्पिटलमधे जरी सेंट्रलाईज्ड ए.सी. असला तरी बेसमेंट पार्किंग आणि लिफ्ट आणि जिने इथे ए.सी. नाही. कुठल्याही मजल्यावर हॅास्पिटलमधे शिरण्यासाठी ढकलून किंवा खेचून, दोन्ही दिशांना उघडणारे दरवाजे आहेत.सर्व दरवाजांवर ॲाटोमॅटिक डोअर क्लोजर्स आहेत. त्या दारांना जिथे हॅंडल्स आहेत तिथे पुश किंवा पुल अशा पाट्या आहेत.
दार उघडताना बाहेरील हवा आत येऊ नये किंवा बाहेर जाऊ नये या पैकी एक काहीतरी कारण आहे. नाहीतर दोन्ही बाजूने उघडणाऱ्या दरवाजावर पुश किंवा पुल हे लिहायची काही गरज नाही. माझा मित्र डॅा. राजेश पाटील याला काही कारण नसताना, चुकुन मी ही पुश-पुल बाबतची शंका विचारली. लगेच त्याने मला कॅंटीनमधे बसवून, ‘फोकाशिया सब’ किंवा तत्सम नावाचा पदार्थ मागवला, सोबत टिशू पेपर मागवले. हे पदार्थ खात, त्याने टिशू पेपरवर काहीतरी अगम्य आकृत्या काढल्या, हवेचा दाब, तपमान, हवेचे आकारमान अशा गोष्टींपासून सुरवात करून, दोन कप कॅाफी पिताना खूप काही समजावले. शेवटी फोकाशिया सब मधील शेवटचा तुकडा संपवला आणि म्हणाला, “म्हणून या दरवाजांवर पुश-पुल अशा पाट्या असतात”.
“वा! आज कळलं काय ते” असं मी खोटं बोललो. कळलं नाही असं म्हटलं असतं तर त्याने अजून एक प्लेट पंजाबी सामोसा मागवून पुन्हा खोलात जाऊन समजावण्याचा प्रयत्न केला असता. त्याचा खाण्यावर कंट्रोल रहावा म्हणून असं खोटं बोलण्याचं पातक घडतं हातून.
तर अस ते दार. यातील एका दाराच सेटिंग बिघडले असावे बहुतेक. ते ढकलायला बराच जोर लागतो आणि ढकलले आणि आपण बाहेर पडून दार सोडले की ते वेगात बंद होते. सध्या कोरोनापासून वाचण्यासाठी लोक किती विविधप्रकारे दारं उघडतात हे एकदा बघाच. दुधी काचेमधून दुसऱ्या बाजूस कुणीतरी आहे हे कळतं. काही वेळा दोघेही दार ढकलतात, कधी दोघेही दार खेचतात. बरेचदा दोघेही वाट बघतात समोरचा दरवाजा उघडेल म्हणून. कोरोनाच्या भितीने लोक शक्यतो दाराला हात न लावता दार इतर कुणी उघडण्याची वाट बघतात.
कोरोनाच्या सुरवातीच्या काळात लोक बंद मूठ टेकवून दार उघडायचे. त्यामुळे दार खेचून उघडणे तर बंदच झाले. नंतर कुणीतरी टूम काढली की कोपराने दार ढकलायचे. याचं एक कारण दिलं जायच की माणूस काय वाटेल ते प्रयत्न केले तरी आपलं कोपर चाटू शकत नाही किंवा कोपर चेहऱ्याजवळ आणू शकत नाही.
हे करून बघा. कोपराला जीभ लावण्याचा (स्वत:ची जीभ स्वत:चे कोपर) विडिओ फेसबुकवर टाकण्याचे चॅलेंज कसे आहे ? असे अनेक उपाय ओपीडीत बसल्या बसल्या, लोक एकमेकांना सांगत असतात.
आमच्या ॲार्थो ओपीडी मधल्या वेटिंगरूम मधील संवाद
ताई १ : अय्या,वॅाट अ सरप्राईज!!तू इकडे कुठे?
ताई २ : पाठीला मार लागलाय. फडणिस डॅा. ना पाठ दाखवायची आहे. तू कशी काय इकडे?
ताई १ : मी पण फडणिस सरांकडेच. घरी नवरोजींनी बाथरूम धुवायची म्हणून साबण घालून ठेवला आणि धुवायला विसरले. त्या साबणावरून मी पडले आणि गुडघ्याला लागलं. तुला पाठीला मार कसा बसला ?
ताई २ : कोरोना मुळे. करोना होऊ नये म्हणून काळजी घ्यायला गेले दार उघडताना आणि पाठीला मार बसला.
ताई १ : दार उघडताना, कोरोना प्रिवेंट करण्यासाठी कुठेही हाता ऐवजी कोपर वापरायचं असतं.
ताई २ : हाऊ कॅन यू यूज युवर कोपर फॅार एव्हरीथिंग दॅट यू डू विथ हॅंड?
ताई १ : यू नॅाटी !! नॅाट राउतवाला नॅाटी हं!! आय मीन टू ओपन द डोअर गं
ताई २: ओ येस. माय हब्बी टोल्ड मी
ताई १ : बट व्हाय ग सो ?
ताई २ : आय आस्क्ड द सेम ॲंड हब्बी टोल्ड दॅट यू कॅनॅाट टच युवर नोज ॲार लिप्स टू अवर ओन कोपर. सो इफ यू टच्ड डोअर करोना, इट कॅननॅाट एंटर यू.
ताई १ : इज इट रिअली ट्रू ? ॲार जस्ट भंकस ?
ताई २: आय मायसेल्फ ट्राईड ॲंड रियली यू कॅननॅाट.
मग ताई १ नी बरेच प्रयत्न करून पाहिले. शेवटी म्हणाल्या
ताई १ : ट्रूच गं. वंडर हाऊ मेनी सीक्रेट्स अवर बॅाडी हॅज नो ?
ताई २: यू नो वुई हॅड वन अमित इन अवर क्लास ?
ताई १ : हू हू ग ?( कोण कोण ग चे इंग्रजी रूप ) विच वन ? द वन हू मॅरीड टु सोनाली ॲार द वन हू हॅड क्रश ॲान एव्हरी गर्ल?
ताई २ : दॅट वन नो,हूम यू यूज्ड टु कॅाल पॅालिक्रशर
ताई १ : द्याट वन होय? नो नो ग. आय ॲम टॅाकिंग अबाऊट सोनाली अमित मिडल अमित ( मिडल अमित ? हं, सोनाली अमित या जोडी मधला अमित . त्या मधला चं मिडल झालं.ते शेक्सपिअर आणि ज्ञानेश्वर एकमेकांकडे बघत रडले हे ऐकून ) वॅाट हॅपन्ड टू अमित ?
ताई २ : नथिंग ग. बट सोनालीवाला अमित हॅज बिकम अ ह्यूज डॅाक्टर. ( मोठा डॅाक्टर)
ताई १ : ही लुक्ड सो क्यूट.
ताई २: ही टोल्ड, यूज युवर टोज टू ओपन डोअर
ताई १ : व्हाय व्हाय?
ताई २ : अमित टोल्ड मी, व्हेन यू गो टू हिज केबिन, यू सिट विथ युवर कोपर ॲान टेबल.मग दारावरचा कोरोना, कोपरावरून टेबलावर आणि टेबलावरून दुसऱ्या पेशंटच्या कोपरावर जाऊ शकतो, म्हणून.
ताई १: गेला समजा तरी तो पेशंट तरी कोपर कसं तोंडाजवळ नेणार?
ताई २: आय एक्सॅक्टली सेड धिस.तर तो म्हणाला हसबंड किंवा वाईफ टुगेदर चालताना हात कोपराला लागून मग तो हात तोंडानाकाजवळ गेला तर त्याला कोरोना होऊ शकतो ना!!
ताई १ : किती लॉंगचं थिंकिंग आहे.अमित वॅाज ॲालवेज ए लॅांग थिंकर
ताई २ : म्हणून म्हणे पायानी दार उघडायचे.
ताई १: पायानी ?
ताई २: हो ना.मी पायानी दार ढकललं तर ते एवढसं ढकलल जायचं. त्यातून बाहेर कसं पडणार? मग मी जरा जास्त जोर लावला. दार उघडले. मी बाहेर पडले पण दार माझ्यापेक्षा जास्त चपळ निघाले. थाडकन येऊन आपटले अंगावर !! मी एवढी दचकले आणि धाडकन् पाठीवर पडले.
ताई १ : मग सांगितलंस कि नाही अमितला ?
ताई २: सांगितलं ना. तो काय क्यूट लाजला. सॅारी सॅारी म्हणाला. म्हणाला, पुढच्या वेळेला येशील ना तेव्हा मला फोन कर
ताई १: तो तुला दार उघडून रिसीव करायला येणार? आय ॲम ‘जे’ ग (इथे जे म्हणजे “जेलस” – jealous )
ताई २ : मलाही तसंच वाटलं.पण म्हणाला,“मी आठवण करून देईन की डायरेक्ट लिफ्टनी वर ये”
ताई १ : स्कूलमधे असा नव्हता. तेव्हा तर आपल्याला स्कूलबस मधून उतरताना पण हाताला धरून उतरवायचा.
ताई २: मॅरेज चेंजेस अ मॅन.
ताई १: माझा नंबर आला. हा माझा नंबर घे. पुढच्या विजिटला भेटू. बाय !
तर कोरोना मुळे असेही घडते.
अशा अनेक गोष्टी मी शेअर करेनच.
आणि
उद्या सकाळी 9 वाजता आपल्या Health and wisdom च्या fb live ला जॉईन करा
विषय आहे – साबुदाणा To be or not to be

Dr Nitin Patankar
Consultant – Diabetes, Obesity and Lifestyle Disorders
Wisdom Clinic – Mulund
Jupiter Hospital Thane
Contact : 9223145555

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X