कोविड आणि नवपंचायतन

कोविड या विषाणूने आपले जग अनेक प्रकारे बदलून टाकले आहे. ‘पल्स ॲाक्सिमीटर’ रक्तातील प्राणवायूचे प्रमाण आणि हृदयाची गती मोजण्याचे यंत्र घरोघर वापरले जाईल, असे भाकीत अगदी २०१९ च्या मध्यात कुणी केले असते तर त्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता. पण आज घरोघरी ही यंत्र दिसतात. अनेक जण तर दिवसभरांत मधुनमधुन ॲाक्सिजन सॅच्युरेशन बघतात. हे सॅच्युरेशन बघून त्यावर आधारित, ‘डॅाक्टरला फोन करूया, डॅाक्टरकडे जाउया’ असे काही ठरवायचे असेल तर घेतलेले रीडिंग शक्य तितके अचूक हवे. ते कसे घ्यायचे त्याची थोडक्यात माहिती घेउ.

हे मशीन म्हणजे खरेतर रंग मोजण्याचे मशीन असते. मशीनमधे बोट सरकवले की एक दिवा लागतो त्यातून बाहेर पडणाऱा उजेड, बोटातून पार होतो. पल्सॲाक्सिमीटरमधे दोन LED (light emitting diodes) असतात. त्यातील physics or more accurately quantum physics च्या जास्त खोलात शिरले नाही तर असे म्हणता येईल की ‘रक्तातील हिमोग्लोबिनने जितका ॲाक्सिजन धरून ठेवला असेल, त्या प्रमाणात त्याची लाली कमीजास्त असते. ती पातळी मोजून ॲाक्सिजन सॅच्युरेशन डिस्प्ले केले जाते. हृदयाच्या आकुंचन, प्रसरणासोबत बोटामधून वाहणारे रक्त कमी जास्त होत असते. ती गती मोजून आपल्याला मशीन पल्सरेट दाखवते. पल्स आणि ॲाक्सिजन दोन्ही दाखविणारे यंत्र म्हणून ते ‘पल्स-ॲाक्स’ किंवा ‘पल्सॲाक्सिमीटर’. लहानपणी ज्यांनी बॅटरीचा प्रकाश हाताच्या एका बाजूवर टाकून आपले हात आणि नखे किती लाल आहेत हे बघितले असेल, त्यांना पल्स-ॲाक्सिमीटर कसा काम करतो याचा अंदाज येईल. ज्यांनी हा प्रयोग लहानपणी केला नसेल, त्यांनी मोबाइलमधील लाईट चालू करून त्यावर एक बोट ठेवले की त्यांना बोटाचा खास करून नखांचा लाल रंग बघता येईल.

पल्स ॲाक्सिमीटरचे हे तत्व कळले की त्यात अचूकता आणण्यासाठी काय करायला हवे ते लक्षात येईल.

१) रक्तातील हिमोग्लोबीनचा रंग बघताना त्यासोबत इतर रंग मोजले जायला नकोत. म्हणून खोटी नखे असतील तर ती काढणे. ( माझ्या कन्येने या विषयांवर मला बरेच ज्ञान दिले आहे. ती माहिती मिळेपर्यंत खोटी नखे म्हणजे शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे इतपत माहिती होती. ) नेलपॅालिश काढणे. इतर कसले रंग असतील कर काढून टाकणे.

२) कुठल्याही कारणाने हात थंड पडले असतील तर ते गरम करणे. थंड पडणे म्हणजे त्या भागातील रक्ताभिसरण कमी असल्याचे लक्षण आहे. हातावर हात घासून त्यात थोडी उब आली की मग ॲाक्सिजन सॅच्युरेशन बघावे.

३) कुठूनतरी धावपळ करून आले असू, तर रक्तप्रवाह मोठ्या स्नायूंकडे वळवला जातो. बोटांमधे कमी रक्त प्रवाह असण्याची शक्यता असते. पल्सॲाक्स रिडिंग घेण्यापूर्वी निदान पाच मिनिटे तरी स्वस्थ बसावे, किंवा पडून रहावे.

४) हात टांगता ठेवू नये. आडवे पडून हात छातीवर ठेवून रीडींग घ्यावे. बसले असू तर पल्सॲाक्समीटर वापरणारा हात छातीवर हृदयावर धरावा आणि दुसऱ्या हाताने त्याला आधार द्यावा. हात स्थिर असावा. श्वासाची गती नियमित असावी.

५) अशी तयारी झाली की शक्यतो मधले बोट किंवा तर्जनी पल्सॲाक्सिमीटरमधे सरकवावी. मग मशीन ॲान करावे. काही मशीन ॲाटोमॅटिकली ॲान होतात.

६) रीडींग सुरवातीस जास्त फ्लक्चुएट होते. ते पूर्ण स्थिर झाले नाही तरी दोन व्हॅल्यूमधील फरक कमितकमी राहिला, व्हॅल्यू स्थिर झाली, की आपल्याला रक्तातील ॲाक्सिजन सॅच्युरेशनचा अचूक अंदाज येतो. यास मिनिट दोन मिनिटे लागू शकतात.

७) पल्सॲाक्सिमीटर बिघडणे, खराब होणे याचे मुख्य कारण म्हणजे, अनेक जण त्यात पेन किंवा पेन्सिल घालून काय होते हे बघण्याची बालसुलभ उत्सुकता थोपवू शकत नाहीत.

नव्या युगातील पंचायतनातील एक यंत्र आणि ते वापरण्याचे तंत्र. – पल्स ॲाक्सिमीटर

पुढील लेखांतून पंचायनातील इतर यंत्र आणि त्यांना वापरण्याचे तंत्र या बद्दल माहिती घेउ.

पंचायतनातील इतर यंत्र आहेत

Dr Nitin Patankar
Consultant – Diabetes, Obesity and Lifestyle Disorders
Wisdom Clinic – Mulund
Jupiter Hospital Thane
Contact : 9223145555

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X