गीता आजीच्या गोष्टी -२

‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ अशी म्हण आहे. पाळण्यातील मूल जोरजोरात पाय हलवून खेळत असेल तर ती पुढे ‘पी.टी. उषा’ होणार असे भाकीत वर्तविणारे कमी नसतात. नशीब त्या मुलांचे, की कोणी त्यांना पहिल्याच वाढदिवसाला धावण्याचे बूट आणून देत नाही.

माझ्या बाबतीत मात्र गोष्टी जरा वेगळ्या घडत गेल्या. मी कधीतरी भगवद्-गीतेवर काही लिहीन हे नियतीला कळले होते. मी तिसरी किंवा चौथीत असेन तेव्हाची गोष्ट.
त्या वेळेस २६ जानेवारी, १५ ॲागस्ट आणि टिळक पुण्यितथी या दिवशी वक्तृत्व स्पर्धा असत किंवा निदान काही मुलांना पकडून स्टेजवर भाषणासाठी उभे केले जाई. बहुतेक सगळ्यांची भाषणे सारखीच असत. भाषणाची सुरवात नेहमी, “बंधू आणि भिगनींनो, आज मी जे चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी मी आशा करतो” अशी असे. शेवट हा, “ मी जे दोन शब्द बोललो ते आपण शांत चित्ताने ऐकू न घेतलेत या बद्दल मी आभारी आहे जय हिंद” ही अशीच असे.

तेव्हा जय हिंद पुरत असे. हल्ली कसे जय हिंद, जय महाराष्ट्र असा जय-जय कार करायचा असतो ती पद्धत नव्हती. टिळक पुण्यितथीला, ‘रत्नागिरीने अनेक रत्ने दिली त्यातील एक म्हणजे बाळ गंगाधर टिळक’ अशी सुरवा त होई. मग संत या शब्दावरून टिळकांनी घातलेला वाद, ती न उचललेली टरफले, स्वराज्य हा माझा जन्मिसद्ध हक्क, मंडालेला जाउन लिहलेले गीतारहस्य या मागार्वरून गाडी १ ॲागस्ट वर येउन थांबत असे.

चवथीत मी सुद्धा हेच भाषण केले होते. बहुतेक मी ‘स्वराज्य हा माझा…’ हे जरा जास्तच जोशात म्हटले असावे. त्या स्पधेर्त माझा पिहला क्रमांक आला. या स्पधेर्त बिक्षस म्हणून मला गीतारहस्य हे पुस्तक मिळाले.

तो प्रसंग माझ्या मनावर आघात करून गेला. दुसर्‍या क्रमांकाला भा. रा. भागवतांचे ‘भुताळी जहाज’ हे पुस्तक, तिसर्‍या क्रमांकाला ताम्हणकरांची ‘चिंगी आिण गोट्या’ अशी दोन पुस्तके .कहर म्हणजे उत्तेजनार्थ म्हणून तिघांना ‘चांदोबा की विचत्र विश्व’ असं काहीतरी. अशी बिक्षसांची प्रतवारी बघून मला प्रचंड दु:ख झाले आणि मी ‘पुढे कधीही कुठेही पिहला येणार नाही’ असा पण केला आणि तो आजतागायत पाळला.

खरे तर मी पुन्हा भाषण करणार नाही असा ओरिजनल पण होता. तो मी घरात बोलून दाखवला. त्यावर विडलांनी जी सणसणित प्रितिक्रया दिली त्यामुळे मला ‘मूळ’ पण मागे घ्यायला लागला. आज आपण भाषणस्वातंत्र्याच्या गोष्टी करतो, निर्भीड संपादक अग्रलेख मागे घेतात म्हणून नावं ठेवतो; पण त्या काळात भाषण स्वातंत्र्य सोडाच, भाषण न करण्याचं पण स्वातंत्र्य नव्हते. लेख जाउदे अनेकदा भीष्मप्रितज्ञा, ‘दुनियाकी कोई ताकद हमे अलग नही कर सकती ये मेरा वादा है’ सारखी दिलेली वचने; घरातील कर्ता पुरूष किंवा कर्ती स्त्री नुसत्या नजरेच्या धाकाने मोडून काढीत असंत, म्हणूनच मी कधीही पहिला येणार नाही असा गुप्त पण केला, आणि तो कायम पाळला.

तर त्या बालवयापासून मला गीतारहस्याची सोबत आहे. ‘नशीब **, तर काय करील पांडू’ अशी म्हण आहे. (खरे तर हल्ली आपल्या नेत्यांची भाषा ऐकली तर अशा चिन्हांनी शब्द लपवायची गरज नाही हे सहज लक्षात येईल. गोष्ट जुन्या काळातील असल्याने, जुनी पद्धत वापरली आहे). सातवीत असताना एका स्पर्धेत माझा तिसरा क्रमांक आला आणि मला बक्षीस म्हणून साने गुरुजींचे दु:खी हे पुस्तक मिळाले. त्या वेळेस अशी ‘वयाला विसंगत’ पुस्तके देण्याची पद्धत असावी. ते पुस्तक पाहून मला त्या पेक्षा गीतारहस्य वाचूया अशी उमेद मात्र निर्माण झाली.

पुढे मला गीतारहस्याचा खूप उपयोग झाला. अभ्यास करताना खूप टेंशन आले की मी गीतारहस्य वाचायला सुरवात करीत असे. वाचायला सुरवात केली की दोन मिनटात टेंशनचा मागमूस नसे; कारण गुडुप झोप लागे. एकदा असेच रॅंडम पान उघडून वाचायला सुरवात केली. तिथे टिळक म्हणतात, “जी गीता भर युद्धात, कृष्णाने अजुर्नाला, उठ युद्ध कर,जग जिंकून घे, हे सांगण्यासाठी लिहली ती संन्यासमार्गी कशी असेल ?”. ते वाचून अचानक जाणवले की ‘अरे दम है ये आरग्युमेंट में’.
पुढे विवेकानंदांचा राजयोग, गीतारहस्य ज्ञानेश्वरी हे वाचण्याचा योग आला.

हे सर्व वाचन होत असताना, मी एम् डी झालो, सायकॅालॅाजीचे कोर्स केले, स्ट्रेस मॅनेजमेंटचे प्रोग्रॅम करीत होतो. हे सर्व करताना अनेक पुस्तके आणि लेख वाचनात येत. मनांत कुठेतरी मागे एक विचार चालू असे की हे असेच गीतेत सांगितले आहे की. आज इतक्या वर्षांनंतर लक्षात येतं आहे की गीता ही प्रत्येकाला वेगळ्या काळात वेगळी दिसते. मला गीता ही स्ट्रेस मॅनेजमेंट चे मॅन्युअल वाटायचे तेव्हा. वाचकांना ते वाचताना कदाचित त्यातून अजून काही वेगळे अर्थ दिसू शकतील.
हल्ली गोष्टींच्या शेवटी, So moral of the story is अस सांगायची पद्धत असते.

म्हणूनच कुणाला गीताआजी, “आपलं काम करंत रहायचं” असे कर्मयोगाचे मॅारल असलेली गोष्ट सांगते, कुणाला ज्ञानयोग, कुणाला भक्तियोग तर कुणाला अजून काही.
मला बहुतेक ही अशी अखंड गोष्ट झेपणार नाही म्हणून मला छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत.
त्या मी शेअर करणार आहे.

©नितीन पाटणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X