आपली आणि भगवद्गीतेची ओळख ही धमर्ग्रंथ म्हणून व्हायच्या आधी, १२ वा अध्याय पाठ करण्यातून होत असते. रोज एक श्लोक पाठ करायचा. वीस दिवसात अध्याय पाठ.
अजुर्न उवाच
एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पयुर्पासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगिवत्तमाः ॥१॥
श्रीभगवानुवाच
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥२॥
यांतील अजुर्न उवाच आणि श्रीभगवान उवाच याचा अर्थ “अजुर्न म्हणाला, श्रीभगवान म्हणाले” हे सोडले तर बाकी सर्व अगम्य असायचे. गीता १८ अध्यायांची असताना, मधलाच बारावा अध्यायच का निवडला ? त्यात अजुर्न आणि कृष्ण काय म्हणत आहते , ते कशासाठी पाठ करायचे असे अनेक प्रश्न मला पडले होते.
शाळेत हे प्रश्न विचारले तेव्हा, “तुझ्या मठ्ठ डोक्याला काही चालना मिळावी म्हणून हे पाठ करायचे” हे उत्तर मिळाले.
बाबांना हा प्रश्न विचारला तर,“सांगितलं आहे ना करायला?”एवढेचउत्तरिमळाले.मुलांची जिज्ञासा दाबून टाकू नये, त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करावे; या साध्या गोष्टी पण माझ्या लहानपणी घराघरातील आईबापांना ठाउक नव्हत्या.
‘उलट उत्तर’ सोडाच पण ‘उलट प्रश्न’ पण सहन केला जात नसे. त्यातल्या त्यात माझी आई माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायची. तिने मात्र उत्तरे दिली.
‘बाराव्या अध्यायात फक्त २० श्लोक आहते , पाठ करायला सोपा आहे; पाठांतराची सवय लागते, उच्चार स्पष्ट होतात; म्हणून पाठ करायचा तो अध्याय.
मुलांच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर त्याला वा तिला झेपेल आणि पटेल अशा स्वरूपात देणे हे फक्त आईच करू शकते.
१२ वा अध्यायात भक्तियोग वणर्न केलेला आहे. बाकी अध्यायात काय आहे, एकूणच गीता काय सांगते, तत्वज्ञान, अध्यात्म वगैरे प्रश्न पडण्याआधीच, गीता पठणाचे संस्कार व्हायला सुरवात होते. मला जरूर आहे त्या गोष्टी (पाठांतर, स्वच्छ उच्चार, पाठांतरातून बुद्धी वाढेल ), या गीता पांठातरातून मिळतात हे सोप्या शब्दात पटवून देण्याचे कसब हे आईकडेच असते.
सुरवातीलाच शंकांचा, चिकत्सेचा अतिरेक झाला तर ज्ञान ग्रहण करण्याची सुरवातच होत नाही.
त्या ऐवजी गीता मनांत राहिली तर जसे वय आणि समज वाढेल तसे गीतेच्या श्लोकांमधून त्या त्या वयाला, काळाला साजेसे अर्थ आपोआप समोर येउ लागतात.
हे आईला ठावूक असते. म्हणून ती साधे पटेल असे उत्तर देउ शकते.
गीता वाचून समजून घ्यायचा प्रयत्न केला तर, गीता ही सुद्धा आइचीच भूमिका वठवते हे लक्षात येईल. वेगळ्या वेगळ्या वयात, वेगळ्या वेगळ्या समस्या घेउन गीतेकडे गेले तर त्या वयाला, काळाला आणि समस्येला अनुरूप उत्तरे गीता आपल्याला देते.
विनोबांनी म्हणुनच गीतेला गीताई केलं आहे. ज्ञानेश्वरीचं पण तसेच. गीता नामक आईकडून ज्ञानेश्वरांनी उत्तरे मागितली, त्यांना पटतील अशी उत्त्तरे त्यांना मिळाली. ती त्यांनी आपल्याला पटतील आणि झेपतील अशा स्वरूपात आपल्याला दिली म्हणुनच ज्ञानेश्वरांना माउली म्हणतात. त्या न्यायाने खरेतर गीतेला आई न म्हणतां तिला आजीच म्हणायला हवे.
तर या आजीजवळ बसून ज्या गोष्टी ऐकल्या त्या लिहून ठेवल्या आहेत अनेकांनी. आजी मला जशी गोष्ट सांगेल तशीच ती दुसर्या कोणाला सांगणार नाही. ज्याला जसे पटेल तसे गीताआजी सांगणार.
सार तेच पण मार्ग वेगळे. गोव्याला जाताना नाही का, कुणी पनवेल पेण करीत जातात, कुणी पाली मधून, कुणी कोल्हापूरवरून, कुणी विमानाने कुणी कॅटामरान करून. ज्याला जो झेपेल तो मार्ग निवडण्याला टूर गाईड मदत करतात पण शेवटी गोव्यालाच पोहोचवतात. तसचं गीताआजी करते. देवदत्त पटनाईकने My Geeta म्हणून पुस्तक लिहले आहे ते नाव मला खूपच आवडते ते त्यामुळेच.
आज ‘गीता जयंती’. मला सुद्धा गीताआजीने काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्या जमल्या तर लिहून काढायच्या असं आज मनात आलं.
म्हणून लिहून ठेवलेल आज शेअर करतोय.
बघूया गीताजयंती हा शुभारंभ ठरतोय की माझा आरंभशूर होतोय.
©नितीन पाटणकर
1 Comment