डॉक्टरांच्या कॅटेगरीज

१९८६ किंवा १९८७ साल असेल. आमच्या हॅास्टेलवर वसईचा वॅली नावाचा एक वल्ली होता. मिडनाईट मास, क्रिसमस हे मी पहिल्यांदा सामील होऊन बघितले ते त्याच्या घरी. त्याची बोलण्याची खास ढब होती आणि वेगळाच ‘सेन्स ॲाफ ह्यूमर’ होता. ‘थर्ड टर्म’ संपत आली होती, परीक्षा दोन दिवसांवर आली होती. ‘थर्ड टर्म’ या शब्दाचा अर्थ जुन्या काळात एम्.बी.बी.एस्. झालेल्यांनाच कळेल किंवा काळजाला भिडेल. गेल्या दहा पंधरा वर्षात डॅाक्टर झालेल्यांनाही त्या शब्दामागचं भय कळणार नाही. तर थर्ड टर्म च्या शेवटी, जेव्हा डोक्यात काहीही शिरण्याचे बंद झालेले असते; तेव्हा वॅली आला, अत्यंत सिरिअसली म्हणाला; “आत्ता आपण जी मेहनत घेत आहोत त्यावरून फ्यूचरमधील, डॅाक्टरांच्या कुठच्या कॅटेगरीत आपण बसू हे अजिबात कळणार नाही”.
सगळ्यांनी मान वर करून बघितलं. कोणाला काहीही अर्थबोध झाला नव्हता. वॅली पुढे म्हणाला. “मेहनत नाही तर नशीब ठरवते रे, तुम्ही कुठच्या कॅटेगरीत असाल ते”. न राहवून कुणीतरी विचारलं की, “कुठच्या कॅटेगरीज् असतात?”
तो म्हणाला “तुम्ही कामात इतके बुडून जाल, आणि तेच आजार तीच ट्रीटमेंट आणि नवीन काही शिकायला वेळ नाही. सगळा तोचतोचपणा, बोअरडम् आणि इतकी गर्दी की, you can’t afford a minute to read newspaper”.
कुणीतरी विचारलं “आणि दुसरी कॅटेगरी?”
वॅली म्हणाला, “you can’t afford a newspaper”
तुम्हालाही या कॅटेगरी दिसत असतील. सगळ्यांनाच पहिल्या कॅटेगरीतील डॅाक्टर हवे असतात.
त्यांच्याकडे गेलं की कमीतकमी वेळात, जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल, आणि डॅाक्टरला शांत ठेऊन जास्त विचार करायला लावायचा असेल, थोडक्यात ‘पैसा वसूल करायचा असेल’ तर काही ट्रिक्स आहेत.
उद्या सकाळी 9 वाजता, दर रविवारी असते तसेच
हेल्थ ॲंड विस्डम पेजवरून एफ्.बी. लाइव्ह आहे
विषय आहे
“डॅाक्टरकडे जातानाची पूर्वतयारी”
तेव्हा पेज विजिट करा, लाईक करा
हा मेसेज शेअर करा
आणि “In Search of Wisdom” या youtube पेजला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका

डॅा. नितीन पाटणकर एम्.डी.
Director : Wisdom Clinic
Diabetes, Obesity and Yoga-Music Therapy
For appointment Contact : 9223145555

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X